1.सेंद्रिय पदार्थाचे विघटन 2.सेंद्रिय पदार्थाचे जमिनीतील वितरण. 3.गवत व झाडांच्या पानांचा थर साठून झालेली घटट चटई गांडुळ फोडून काढ्तात. 4.जमिनीतील जीवाणूंची कार्यक्षमता वाढते . 5.सेंद्रिय पदा्र्थापासून पीकांचे अन्नद्रव्य पीकांना उपलब्ध करतात . 6.जमिनीच्या कणांची कणीदार संरचना करण्यास गांडुळ मदत करतात . 7.जमिनीची जलधारण क्षमता वाढते . 8.गांडूळाच्या बिळांमुळे झाडांच्या मुळ्या खोल वाढतात ,पाणी लवकर मुरते व हवा खेळती राहते. 9.पाण्यचा निचरा चागंला होतो. 10.पिकांचे व गवताचे उत्पादन वाढते . 11.जमिनीची उत्पादन क्षमता वाढते . 12.गांडूळ सेंद्रिय पदार्थाचे तुकडे करून खातात व जमिनीत मिसळतात त्यामुळे जीवाणूंची चागंली वाढ होते . .
सेंद्रिय पदार्थ (वनस्पतीचे व मेलेल्या प्राण्याचे अवशेष ) जमिनीत असतात.त्यावर सुक्ष्म जीवाणूं ,गाडूळ व इतर सुक्ष्म जीवजंतु व प्राणी उपजीविका करुन त्या पदार्थाचे विघटन करतात .व वाढीसाठी हे विघटन पदार्थ पिकांचे अन्नद्रव्य म्हणून पिकांच्या वाढीसाठी वापरले जातात . गांडूळ जमिनीतील पाला-पाचोळा,मुळ्या इ . विघटन करतात हे पदार्थ त्यांच्या (गांडूळांच्या) पचन संस्थेत प्रवेश केल्यानतंर विविध विकरांचा परिणाम होऊन त्यांचे विघटन होते. सेंद्रिय पदार्थ हे गांडूळांचे अन्न आहे म्हणून ते मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थ खातात .गांडूळाच्या काही जाती सेंद्रिय पदार्थासोबत मातीपण खातात. गांडूळाच्या विष्ठेत कँलशियम ,मँग्रेशीयम ,पलाश ,स्फुरद व मालीबडेनम ही अन्नद्रव्ये असतात.
गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व खनिज नत्राचे प्रमाण वाढते .
ज्या खतात गांडूळाची विष्ठा नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ ,गाडूळाची अंडीपुंज ,त्यांच्या बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जिवाणूंचा समावेश असतो त्या खतास गांडूळ खत म्हणतात . जाती :आयसेनिया फिटीडी ,युड्रीलस ,लँम्पेटो मारूटी संरक्षण : उन्हाळ्यात ताट्याचे छप्पर, पावसाळ्यात प्लास्टिकचे छप्पर
गारगोटी © 2018
Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+
:::| powered by AMP-SOFT IT SOLUTIONS PVT.LTD. |:::