बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो.
हवामान : बटाटा हे थंड हवामानातील पिक आहे. या पिकास सरासरी १६ ते २१ सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या सुरवातीच्या काळात २४ सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात २० सेल्सिअस तापमान अनुकूल असते. बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण हवामान व बटाटे पोसण्याचे वेळी थंड हवामान या पिकास पोषक असते.
जमीन : मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमीन कसदार भुसभुशीत व उत्तम निचऱ्याची असावी. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा.
काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्ये दररोज उपयोग होतो. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते.
हवामान व जमीन : काकडी हे उष्ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते.
लागवडीचा हंगाम : काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात होते. खरीप हंगामासाठीकाकडीची लागवड जून जूलै महिन्यात व उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यात करतात.
कारली व दोडका या सारख्या वेलभाज्यांना मांडव बांबू इत्यादी प्रकारांचा आधार दयावा लागतो. कार्ली व दोडका यांच्या वाढीची सवय व मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत. महाराष्ट्रामध्ये कारल्याच्या अंदाजे 453 हेक्टर क्षेत्र असून दोडका या पिकाखाली 1147 हेक्टर क्षेत्र आहे. कार्ल्याला परदेशात व मोठया शहरात तर दोडक्याला स्थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते.
हवामान : या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड करतात. कारल्यास उष्ण व दमट हवामान तर दोडक्यास समशितोष्ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो. मात्र कारल्याच्या वेलीवर थंडीचा परिणाम होतो.
जमीन : भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्यम जमनीत लागवड करावी. चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत. पूर्वमशागत व लागवड : जमीनीची उभी आडवी नांगरट करून तणांचे व गवतांचे तुकडे वेचून शेत स्वच्छ करावे. तद नंतर प्रति हेक्टरी 100 ते 150 क्विंटल शेणखत किंवा कंपोस्टखत टाकावे. कुळवणी करून खत जमिनीत चांगले मिसळावे. कारल्याची लागवडीसाठी दोन ओळीत 1.5 ते 2 मिटर व दोन वेलीत 60 सेमी अंतर ठेवावे. दोडक्यासाठी दोन ओळी 2.5 ते 3.5 मिटर वर दोन वेलीत 80 ते 120 सेमी अंतर ठेवतात. प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 बिया लावतात. दोन्ही पिकात बियांची टोकन ओलसर जमिनीत करावीत. बिया वरंब्याच्या बगलेत टोकाव्यात. उगवण होईपर्यंत पाणी बेताचे द्यावे. हंगाम : कारल्याची लागवड उन्हाळी पिकासाठी जानेवारी फेब्रूवारी महिन्यात करतात. उशिरात उशिरा मार्चमध्ये सुध्दा लागवड करतात. खरीपाची लागवड जून जूलै महिन्यात करतात. दोडका कमी दिवसात येणारा असल्यामुळे त्याची लागवड कारल्यापेक्षा 15 ते 20 दिवसांनी उशिरा केली तरी चालते
गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाची भाजीसाठी उपयोग केला आजतो तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो. ग्रामीण भागात हे अतिशय लोकप्रिय पिक आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ८९१० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश हे जनावरासाठी हिरवा चारा हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते. गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळूवून देणारे पिक म्हणून याकडे पहिले जाते. गवारीच्या शेंगामध्ये फाँस्फरस, चुना, लोह इत्यादी खनिजे आणि अ, ब, क जीवनसत्वे बरयाच प्रमाणात असतात. गवारीच्या डिंकाचा कागद, कापड, सौंदर्य प्रसाधने आणि स्फोटकात उपयोग केला होतो.
हवामान व जमीन : गवार हे उष्ण हवामानातील पिक असून सरासरी १८ ३० अंश सेल्सिंअस तपमानास हे पिक उत्तम येते. खरीपातील उष्ण व दमटहवेमुळे झाडांची वाढ चांगली होते. हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही. हे पिक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. उत्तम पाण्याचा चांगला निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू ७.५ ते ८ च्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते.
लागवड हंगाम : गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगमास गवारीची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. बियांचे प्रमाण हेक्टरी १४ ते २४ किलो बी लागवडीस पुरेसे असते. बियाण्यास पेरणीपूर्व १० ते १५ किलो बियाण्यात २५० ग्रॅम रायझोबियम चीलावे
पालक ही अतिशय लोकप्रीय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्ये लक्षांत घेतांं पालकाची लागवड मोठया प्रमाणावर होणे आवश्यक आहे. पालकाच्या भाजीत अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटीन्स आणि कॅल्शिअम, लागवडीसाठी लोह, फॉस्फरस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकांचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादीमध्ये करतात. पालकाची भाजी काही प्रमाणात सारक आहे.
हवामान : पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्यामुळे महाराष्ट्रात कडक उन्हाळयाचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्पादन जास्त येऊन दर्जा चांगला राहतो. तर तापमान वाढल्यास पीक लवकर फूलो-यावर येते आणि दर्जा खालावतो.
जमीन : पालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येते.
लसूण हे कंदर्प कुलातील एक मसाल्याचे पीक आहे. अन्नपदार्थ स्वादीष्ट होण्यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग करतात. लसणात प्रोपील डायसल्फाईड व लिपीड ही द्रव्ये असतात. चटण्या, भाजी व लोणचे यात लसणाचा वापर केला जातो. पोटाच्या विकारावर पचनशक्ती, कानदुखी डोळयातील विकार डांग्या खोकला इत्यादीवर उपचारासाठी गुणधर्मही लसणात आहेत. महाराष्ट्रात जवळ जवळ 5000 हेक्टर जमीन हया पिकाखाली असून नासिक पुणे ठाणे तसेच मराठवाडा विदर्भात लागवड केली जाते.
हवामान व जमीन : समशितोष्ण हवामान लसूण लागवडीस उपयुक्त असते. मात्र अति उष्ण व अति थंड हवामान या पिकास मानवत नाही. समुद्रसपाटीपासून 1000 ते 1300 मीटर उंचीपर्यंत लसणाची लागवड करता येते. पिकाच्या वाढीच्या काळात 75 सेमी पेक्षा जास्त पाऊस पडत असल्यास पिकाची वाढ चांगली होत नाही. याकरता ऑक्टोबर महिन्यात केलेली लागवड अधिक उत्पादन देते. दिवसाचे 25 ते 28 अंश सें. ग्रे. व रात्रीचे 10 ते 15 अंश सें.ग्रे. तापमानात गडयांची वाढ चांगली होते. मध्यम खोलीच्या भरपूर सेंद्रीय खते घातलेल्या रेती मिश्रित कसदार तणविरहित जमिनीत पीक चांगल्याप्रकारे घेता येते. हलक्या प्रकारच्या जमिनी, चिकण मातीच्या जमिनी लागवडीस योग्य नसतात.
गारगोटी © 2018
Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+
:::| powered by AMP-SOFT IT SOLUTIONS PVT.LTD. |:::