- कायदेशीर परवाना असणार्या नोंदणीकृत कीटकनाशक डीलरकडूनच कीटकनाशके/जैवकीटकनाशके खरेदी करा. - दिलेल्या भागात वापरण्यासाठी एक वेळ पुरेल एवढेच कीटकनाशक खरेदी करा. - कीटकनाशकांच्या पॅकवर/डब्यांवर मान्यतेची लेबल्स नीट पाहून घ्या. - आवरणावरील बॅच नं., नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख/अंतिम मुदत इत्यादि बाबी तपासा. - डब्यांत व्यवस्थित पॅक केलेलीच कीटकनाशके खरेदी करा.
- पदपथावरील/रस्त्याच्या कडेला बसणार्या किंवा कायदेशीर परवाना नसणार्या व्यक्तीकडून कीटकनाशके खरेदी करु नका. - संपूर्ण हंगामासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशक खरेदी करू नका. - मान्यतेची लेबल्स नसलेली कीटकनाशके खरेदी करू नका. - अंतिम मुदत संपलेली कीटकनाशके कधीही खरेदी करू नका. - ज्या डब्यांतून/पॅकमधून गळती होत असेल, डब्याचे/पॅकचे आवरण सैल झाले असेल किंवा सीलबंद नसेल तर अशी कीटकनाशके खरेदी करू नका.
- कीटकनाशके घराच्या आवारापासून दूर साठवा. - कीटकनाशके त्यांच्या मूळच्या डब्यांतच साठवून ठेवा. - कीटकनाशके आणि तणनाशके वेगवेगळी साठवून ठेवा. - जेथे कीटकनाशके साठवली असतील तिथे धोक्याची इशारा निर्देश लावून ठेवा. - कीटकनाशके लहान मुले आणि इतर पाळीव प्राणी यांच्यापासून दूर साठवून ठेवावीत. - साठवणीची जागा थेट ऊन आणि पाऊस यांपासून सुरक्षित असावी.
- कीटकनाशके घराच्या परिसरांत साठवू नका. - कीटकनाशके त्यांच्या मूळच्या डब्यांखेरीज इतरत्र साठवून ठेऊ नका. - कीटकनाशके आणि तणनाशके एकत्र साठवू नका. - लहान मुलांना साठवणीच्या खोलीत जाऊ देऊ नका. - कीटकनाशके थेट ऊन किंवा पावसात ठेवू नका.
- योग्य प्रकारची साधने निवडा. - योग्य आकाराच्याच नोझल वापरा. - कीटकनाशके आणि तणनाशकांसाठी वेगवेगळी फवारणी यंत्रे वापरा.
- गळणारी किंवा दोष असणारी साधने वापरू नका. - दोष असणार्या/मान्यता नसणार्या नोझल वापरू नका. चोंदलेली नोझल्स तोंडाने साफ करू नका. त्याऐवजी फवारणी यंत्राबरोबर असणारे टूथब्रश वापरा. - कधी ही कीटकनाशके आणि तणनाशकांसाठी एकच फवारणी यंत्र वापरू नका.
गारगोटी © 2018
Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+
:::| powered by AMP-SOFT IT SOLUTIONS PVT.LTD. |:::