रेशीम उद्योग
दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो. शेतकयांस कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. या पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते. पट्टा पध्दतीस अत्यंत कमी पाणी लागते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुती जोपासता येते. .तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 15 वर्षे पर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकयांस देखील हा व्यवसाय करता येतो. कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून तो जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन यासारखे शेती पूरक व्यवसाय व ऊस, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेणाऱ्या शेतकयांना देखील हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. पट्टा पध्दतीने तुतीची आंतरमशागत मजूंराएवजी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत वेळेवर करुन घेता येते. यामुळे मजूरी खर्चात व वेळेत मोठया प्रमाणात बचत होते. पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेवून उत्पन्नात भर घालता येते. तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने 450 टक्के अनुदान दरात शासना मार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते. त्यातील 24 दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या 24 दिवसांपैक सुरवातीचे 10 दिवस शासना मार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांस अवघ्या 14 दिवसांत कोश उत्पादनाचे पीक घेता येईल. यामुळे शेतकयांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात 25 टक्के पर्यंत वाढ होईल.
शेतीमध्ये रेशीम कोशा शिवाय अवघ्या 14 दिवसांत उत्पन्न देणारे आज एकही नगदी पीक नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते. तसेच महिन्यात रविवारप्रमाणे चार दिवस सुट्टी उपभोगता येते. इतर शेती पिकां प्रमाणे यात पूर्ण व मोठया प्रमाणात नुकसान होत नाही. शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सदर कोश खरेदी ही शास्त्रीय पध्दतीने होत असून त्याचा दर रु. 65/- ते रु.130/- प्रती कि आहे.
रेशीम उद्योगातून इतर फायदे
1. रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते.
2. वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
3. तुतीच्या वाळलेल्या इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते.
4. संगोपनाक वापरलेल्या चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.
5. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
6. तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु 3500/- ते 4500/- जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
7. तुतीच्या पानांमध्ये व ये जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे.
8. विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.
9. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.
तुती लागवड
तुती बेणे तयार करणे: तुती लागवड तुतीबेण्या पासून करायची असते. त्यासाठी एम-5, एस-54, एस-36, व्ही -1 अशा सुधारीत जातीची बेणे वापरावीत. बेणे तयार करतांना 6 ते 8 महिने वयाच्या तुती झाडांची 10 ते 12 मि.मि. जाडीच्या फांद्या निवडण्यात याव्यात व बेण्याची लांबी 6 ते 8 इंच असावी. त्यावर किमान 3 ते 4 डोळे असावेत व तुकडे करातांना धारदार कोयत्याने तुकडे करावेत कोवळया फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरु नयेत.
तुती बेण्यावरील रासायनीक प्रक्रिया
तुती कलमे तयार केल्यानंतर जमीनतली वाळवी/ उधळी, बुराशी रोगापासून बेण्याचे नुकसान होऊ नये यासाठी खालील प्रमाणे बेण्यावर रासायनिक प्रकिया करावी.
1) थॉयमेटच्या 1 टक्के द्रावणात कलमे 4 ते 5 तास बुडवून ठेवावेत.
2) बुरशी नाशक बाव्हिस्टिन, कॅप्टॉन यांचे 1 टक्के द्रावणात तुती बेणे 4 ते 5 तास बुडवून ठेवाव्यात.
3) तुती झाडाचा लवकर मुळे फुटावीत या करिता रुटेक्स पावडर किंवा कॅरडॉक्स पावडर बेण्याच्या खालच्या भागास लावावी त्यामुळे लवकर मुळे फुटून झाडांची जोमदार वाढ होईल.
तुतीचे लागवड अंतर
सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील शेतकरी तुतीची लागवड करतांना 3 द 3 अंतरावर लागवड करीत होते. परंतू आता सन 98 - 99 पासून नविन सुधारीत पध्दतीनुसार फांदी पध्दत किटक संगोपनामध्ये वापरली जात असल्यामुळे फांदी पध्दतीसाठी महाराष्ट्रात नव्यानेच रेशीम संचालनालया मार्फत तुती लागवडीसाठी 5 द 2 द 1 फुट अंतर मध्यम जमिनीसाठी व 6 द 2 द 1 भारी जमिनीसाठी तुती कलमांची लागवड करवून घेण्यात येत आहे. या पध्दतीमध्ये तुती झाडाची संख्या एकरी 10890 इतकी बसते. त्यामुळे प्रति एकरी पाल्याच्या उत्पादनात 3 द 3 फुट लागवड पध्दतीपेक्षा दुपटीने वाढ होते.
पट्टा पध्दतीच्या तुती लागवडीपासून फायदे:
1) या पध्दतीमुळे झाडाची संख्या मोठया प्रमाणात वाढते.
2) तुती लागवडीमध्ये हवा खेळती राहते व भरपूर प्रमाणात सुर्यप्रकाश सर्व झाडांना मिळाल्यामुळे तुती पाल्याची प्रत चांगली मिळते व पाल्याचे उत्पादन ही भरपूर प्रमाणात वाढते.
3) आंतर मशागत करण्यासाठी सोईचे होते.
4) कोळपणी करुन तुती झाडांच्या रांगामधील तण काढू शकतो. त्यामुळे निंदणी करील खर्च कमी करता येतो.
5) बुराशीपासुन होणारे रोग पानावरील ठिपके, भूरी व तांबेरा यांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो.
6) शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असेल तर दोन सरीमध्ये पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत होते व कमी पाण्यात लागवडीची जोपासना करता येते.
7) मधल्या पटयात भाजीपाला व इतर अंतर पिके घेऊन बोनस उत्पादन मिळवीता येते.
तुती लागवड करतांना घ्यावयाची काळजी:
1) लागवडीकरिता किमान सहा महिने जूने व बागेस पाणी दिलेले तुती बेणे वापरावे. त्यानंतर
2) तुती बेणे छाटणी केल्यापासून 24 तासांच्या आत लागवड केल्यास त्याचा फुटवा चांगला होतो व बागेत तुट अळी पडत नाही.
3) तुती बेणे छाटणी धारदार हत्याराने किंवा सिकॅटरने 3 ते 4 डोक्यावरच करावी. जास्त लांब काडी तोडू नये.
4) तुतीची लागवड 5 द 3 द2 किंवा 6 द 2 द 1 अथवा इतर अंतरावर जोड ओळ पध्दतीनेच करावी.
5) तुतीची काडी लावताना 3 डोळे जमिनीत व एकच उभा डोळा जमीनीवर ठेवावा. उलटी काडी लावू नये.
6) जमिनीत वाळवी व बुरशीचा प्रादूर्भाव असल्यास तुती बेण्यास क्लोअरपायरीफॉस, बावीस्टीन / डायथेन एम-4 अथवा कॉपर ऑक्सी क्लोराईड यांची बेणे प्रक्रिया करुनच लागवड करावी.
7) लागवड करातांना कॅरेडिक्स,रुटेक्स किंवा आय.बी.ए. इत्यादीचा वापर करवा.
8) तुती लागवडीमध्ये नैसर्गिकरित्या 10 ते 15 % तुती अळी पडत असल्याने प्रती एकर किमान तुट अळी भरण्यासाठी 1000 रोपांची वेगळी रोपवाटीका करावी.
तुती बागेची आंतर मशागत:
तुती कलमांची लागवड केल्यानंतर 1 महिन्याने खुरपणी /निंदणी करुन गवत/तन काढावे बागेतील गवतामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही व उष्णता निर्माण होवून तुती कलमाची पाने पिवळी पडतात तसेच तुती कलमांना गवतामुळे अन्नद्रव्ये कमी पडून पाने गळून पडतात.त्यामुळे तण काढणे अतिशय आवश्यक बाब आहे. तदनंतर प्रत्येक पीकानंतर उपलब्ध साधन व अंतरानुसार बैलजोडी अथवा टॅक्टरने अंतर मशागत करावी.
तुती झाडांची छाटणी:
तुती बागेच्या आंतरमशागतीमध्ये तुती झाडांची शास्त्रोक्त पध्दतीने छाटनी करण्या फार महत्व आहे. सर्व साधारणपणे शेतकरी फांदी किटक संगोपन पध्दतीचा वापर करत असतांना तुती झाडांची / फांद्याची छाटणी विळयाने फांद्या खेचुन करतो. यामध्ये झाडांचा डींक बाहेर निघून वाया जातो. व मोठया प्रमाणावर नुकसान होते तसेच उन्हाळया झाड सुकून जाऊन गॅप पडतात या करिता शेतकऱ्यांनी तुती झाडांच्या छाटणी करीता प्रमुख्याने सिकॅटरचा वापर केला पाहिजे. प्रथम वर्षी पहीले पीकझाल्यानंतर सिकॅटरच्या सहाय्याने झाडावर निवडक तीन फांद्या ठेऊन (त्रिशुल) बागायती क्षेत्रा करीता जमिनीपासुन 25 ते 30 सेमी. वर छाटणी करावी. आडव्या फांद्या खोडापासूनच काढून टाकाव्यात. तदनंतर 1 वर्ष प्रत्येक पीकानंतर झाडावर सरळ वाढणाऱ्या 7 ते 8 फांद्याची दोन डोळयावर छाटणी करुन उर्वरीत फांद्या काढून टाकाव्यात. दिड ते दोन वर्षानंतर तुती झाडाची जमिनीलगत छोटया करवतीच्या सहाय्याने कापणी करावी. अशा प्रकारे छाटणी केल्यानंतर तुती झाडापासुन सकस व भरपुर पाला मिळतो. कमीपाण्याच्या (आठमाही) क्षेत्रामध्ये तुतीझाडाची प्रथम छाटणी जमिनीपासून एक फुटाच्यावर करावी एक फुटापर्यंत तुती झाडास आडवी फांद्यी न वाढू देता सरळ खोड वाढू द्यावे व पुढील छाटणी एक फुटाचे वर करावी. जिरायत तुती लागवड क्षेत्रात वाढविलेल्या तुती झाडाची दीड ते दोन वर्षानी 4 ते 5 फुट उंचीवर छाटणी करावी व तदनंतर प्रत्येक पीकानंतर दोन डोळे ठेऊन फाद्याची छाटणी करवी.
तुतीबागेस सिंचन:
माहे जुलै ते नोव्हेंबर - महिन्याच्या दरम्यान केलेल्या लागवडीस पावसाच्या पाण्याचा फायदा मिळतो परंतू आपल्याकडे दरवर्षी पाऊस अनियमित पडत असल्यामुळे तुती कलमांचे नुकसान होत व त्यामुळे तुती कलमांची लागवड केल्यानंतर पाऊस कमी पडल्यास किंवा 10 ते 12 दिवसाचा खंड पडल्यास विहिरीचे पाणी देवून कलमे जगतील याची काळजी घ्यावी. लागवड केल्यानंतर सात ते आठ दिवसाच्या अंतराने कलमें जगेपर्यंत पाणी द्यावे नंतर डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत जमिनीची प्रत पाहुन साधारणत: 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात एक वेळातुती लागवडीला 1 ते 1.5 एकर इंच पाण्याची आवश्यकता असते.
तुती लागवडीसाठी गांडुळ व इतर खताचा उपयोग:
तुती लागवड केलेल्या जमिनीत गांडुळ खत वापरणे फयदेशिर आहे. गांडुळखतामुळे जमिनीतील पाला-पाचोळा गांडुळ कुजवितात, जमिनीत हवा खेळती राहण्यासाी पोकळी तयार करतात तसेच जमिनीतील सुक्ष्म जंतुचे कार्यप्रणाली वाढवितात त्यामुळे तुती झाडांना सुक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होवून तुती पानामध्ये कार्बोहायड्ट व प्रथीनांचे प्रमाण देखील वाढते.