शेतीसाठी पाणी हा अनमोल ठेवा आहे. तो मर्यादित आहे. त्याचा वापर काटेकोरपणे करायला हवा.फळझाडे, नगदी पीके, भाजीपाला, फुलझाडे या सर्वासाठी ठिबक सिंचन करणे काळाची गरज आहे. ठिबक सिंचनाची मुख्यतः ऑनलाईन पद्धत, इनलाईन पद्धत, मायक्रो स्प्रिंकलर्स आणि मायक्रो जेट्स असे प्रकार पडतात.
1.पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते. 2.मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी,माती,हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो. 3.वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार आणि सतत होते. 4.पिकाला पाणी रोजच अगर दिवसाआड अथवा गरजेनुसार दिले जाते. 5.पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. त्यामुळे ते मुळच्या सभोवती जिरते. ठीबकच्या या गुणधर्मामुळे पीके चांगली जोमाने वाढतात. दर्जेदार पीक उत्पादन आपल्याला मिळते. ठिबक बसवण्यापूर्वी शेताचा सर्व्हे करून कमी खर्च येईल असा आराखडा तयार करून त्यानुसार संच बसवून घ्यावा आणि साच कर्यन्वीत करावा.
1.ठिबक सिंचनाने रोज गरजेनुसार पाणी दिल्याने पिकांना टन पडत नाही. हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खांद पडत नाही. त्यामुळे झाडांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. 2.उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते. 3.कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. 4.ठिबकने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते. 5.पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते. 6.ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते. 7.बचत झालेल्या पाण्याचा दुसर्या क्षेत्राला ओलीत करण्यासाठी वापर करता येतो. 8.क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तर पिकांचे उत्पादन घेता येते. 9.चढ उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात. 10.कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन काढता येते. 11.जमिनीची धूप थांबते. 12.पाणी साठून राहत नाही. 13.जमिनी खराब होत नाही. 14.ठिबकने द्रवरूप खत देता येतात. १००% खताचा वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते. खताचा अपव्यय टळतो. पिकांना सम प्रमाणात खाते देता येतात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो. 15.पाणी देण्यासाठी रानबांधनीची गरज नसते. त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते. 16.दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते. 17.चिंतामुक्त शेतीसाठी ठिबक सिंचन वरदानच म्हंटले पाहिजे. 18.निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे. थोडक्यात म्हणजे मोजक्या पाण्यात जास्त उत्पादन, रासायनिक खतात बचत, मजुरी खर्चात बचत, जमिनीचा कार्यक्षम वापर, तण-नियंत्रण,आदींमुळे दर्जेदार उच्चतम उत्पादन मिळते. बकची कार्यप्रणाली समजून घेतल्यास अतिशय सुलभपणे हि यंत्रणा चालवता येते. ठिबक सिंचनासाठी शासनाने अनुदानही देऊ केले आहे. शिवाय ठिबक सिंचन संचाचे अलीकडे प्रगत तंत्रज्ञान आणि उच्चतम दर्जाचे साहित्य उपलब्ध असल्याने प्रत्येक शेतकर्याने पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा स्वीकार करावा हि काळाची गरज आहे. शाश्वत शेती उत्पादनासाठी ठिबकचा फार मोठा हातभार लागणार आहे.
गारगोटी © 2018
Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+
:::| powered by AMP-SOFT IT SOLUTIONS PVT.LTD. |:::